जाऊ आनंदाच्या गावा - 1
भाग १- अल्प परिचय
भूतकाळातल्या काही आठवणी सदैव आनंद देणाऱ्या असतात विशेषतः बालपणीतल्या ! जेव्हा आपण आपले जुने बालमित्र भेटल्यावर आभासी प्रतिष्ठेचा मुखवटा बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारतो, त्यातला आनंद काही औरच ! कारण ते क्षण आसतातच तेवढे अनमोल निरंतर सुखाची अनुभूती देणारे. म्हणून तर संत तुकारामांनी म्हणून ठेवलय
।। लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
म्हणून मलाही वाटले आपणही आपल्या बालपणाबद्दल लिहावं, जुन्या आठवणीत रमावं आणि त्यातून मिळणारा आनंद आपल्या सर्वासोबत वाटून घ्यावा. म्हणून हा लेखनप्रपंच !
चला तर मग, मी माझा अल्पपरिचय करून देतो
माझं पूर्ण नाव: संतोष तुकाराम विघ्ने

रा.आनंदगाव ता. शिरूर (का) जि. बीड
(सध्या वास्तव्यास पुणे)
(सध्या वास्तव्यास पुणे)
माझा जन्म नक्की किती तारखेला झाला आणि कोणत्या वर्षी झाला हे मलाही आणि माझ्या आईवडीलांना नक्की माहीत नाही. कानाला हात पुरतो म्हणून गुरुजींनी शाळेत नाव घेतलं.एवढाच काय तो आमच्या पृथ्वीवरील अवताराचा ढोबळ पुरावा.
माझ्या जन्मागोदार मोठ्या बहिणीनंतर 3 लेकरं दगावल्यामुळे आई वडील फार चिंताग्रस्त होते, त्यामुळे नवस सायास, दवाखाना सर्वच प्रयत्न चालू होते. आजही आई प्रेमाने तोंडावरून हात फिरवून "नवसाचंय माझं लेकरू" असं कौतुकाने म्हणते.
नवसाचा असल्यामुळे सर्वचजण माझा लाड करायचे, वडील ऊसतोड मुकादम, त्याकाळी परिस्थिती सधन होती. घरात आनंद आणि समाधान होतं. 3 वर्षानंतर अजून एक भीमपराक्रमी भाऊ मला मिळाला(तेव्हा पासून ते आतापर्यंत मचुच्या कोणी नादी लागत नाही, अगदी मीही नाही). आम्ही त्याला लाडाने मचू असं म्हणतो.पण त्याच खरं नाव सचिन . मग ४ वर्षानंतर मग अजून एक भाऊ जन्माला आला , लहानांपासूनच तल्लख बुद्धिमत्ता असलेला आमच्या सर्व भावंडात लहान म्हणून आम्ही त्याला सोनू म्हणतो पण त्याचं खरं नाव संजय ! असा आमच चार बहीणभावंडाचं कुटुंब. ताई (माझी मोठी बहीण अतिशय समजदार , प्रेमळ आणि शांत असल्यामुळे घरात तिचा सर्वच जण मान ठेवत असत. प्रसंगी चिडली तर मारायची पण खूप; त्यामुळे आम्ही जरा ताईला घाबरूनच असत
तसा आमचा पूर्ण परिवार फार दांडगा आहे, आजोबा २ आज्या ,६ चुलते आणि २९ चुलत बहीणभाऊ एवढं विशाल कुटुंब आहे आमचं !
गावातच आजोळ असल्यामुळं आजी- आजोबांकडे कडे नेहमीच जायचो. मला चार मामा , २ मावश्या असं खचाखच भरलेलं आजोळही लाभलं. माझ्या आजीचा नातवंडावर फार जीव.. त्यातला त्यात मी नवसाचा मग काय विचारायलाच नको. माझ्यासाठी आजी मडक्यात दही लावून ठेवायची, कधी कधी मऊ मऊ लोण्याचा गोळा हातावर ठेवी.
माझे चौथ्या नंबरच्या चुलते प्रल्हाद महाराज विघ्ने यांनी सन्यास घेतला आहे, आळंदीला रीतसर वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करून आजीवन वारकरी संप्रदायाचा प्रचार- प्रसार करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारलेय. जेव्हा कधी माझे चुलते प्रल्हाद महाराज घरी येत तेव्हा ते घोडे घेऊन येत आणि मला घोड्यावरून एक रपेट मारून घरी आणून सोडायचे. एकूण 6 चुलते आणि त्यांची कुटुंब असा जवळपास 35-40 लोकांचा बारदाना!! छोटं गोकुळच म्हणा हवं तर सर्वच एकत्र राहायचे. आमच्या भावकीचा एक टुमदार वाडा गावाच्या मध्यभागी होता. त्या वाड्यात जवळपास 10-12 कुटुंब गुण्यागोविंदाने नांदायची. संध्याकाळी सर्वजण एकत्रच जेवण घेत असू. पुरुष मंडळी जेवणं आटोपून बाहेर पडल्यानंतर बायकांच्या गप्पांचा फड रंगायचा. आमची पारू जिजी(दिलीप विघ्ने यांची आई) आणि मोठ्याई यांच्यातील जुगलबंदी पोट धरून हसायला लावायची. आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला बायकांच्या गप्पात प्रवेश होता. आम्ही पूर्वी दोनमजली वाड्यात राहायचो म्हणून आम्हाला वाड्यावरले अशी खेल पडली होती. गावात फटे, भंडरे, पाटील, तळ्याकडले अशा अनेक खेली आजही प्रचलित आहेत आमच्या गावात!

बालपण हे फार निरागस आणि एक अनमोल ईश्वरीय अवस्था असते असं म्हणायला हरकत नाही. आयुष्याच्या कुपीत ठेवलेल्या बालपणीच्या आठवणी आजही मनाला खूप आनंद देतात. कुणाचं बालपण हे गावी गेलेलं तर कुणाचं शहरात, कुणी मनसोक्त जगलं तर काहींना मोजकेच जगायला मिळालं पण बालपण हे प्रत्येकाने जगलंय आणि प्रत्येकात बालक दडलेला असतोच.

मस्त मित्रा. खूप छान लिहितोस. Keep writing and sharing.
ReplyDeleteThanks Dhiraj
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletenice mamashree 👏👏👏👏
ReplyDeleteThanks
Deleteछान संतोष👍👍
ReplyDeleteThank you
Deleteछान लेख
ReplyDelete