Posts

Is India becoming a DICTATORSHIP?   वन नेशन वन पार्टी की हुकूमशाहीची सुरुवात?  २० वर्षांपूर्वी जेव्हा स्व. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावरून पायउतार झाले तेव्हा फार वाईट वाटले होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे आम्हाला भाजपाची ओळख झाली आणि या पक्षाबद्दल एक विशेष आकर्षण राहिले.  पण आता भाजपा पक्षात फार मोठा बदल झालाय, वरिष्ठ नेतृत्व "हे एक देश एक पक्ष पॉलिसी " या दिशेने देशाला हळूहळू पुढे नेत आहे. इतर राजकीय पक्षांना आमच्यात विलीन व्हा अन्यथा तुरुंगात जा हे दोनच पर्याय दिले आहेत .  खालील काही मुद्दे विचार करण्या सारखे आहेत:   आज सुप्रीम कोर्टाच्या नामवंत वकिलांनी सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे ज्यात  ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह एकूण 600 वकिलांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. देशातील एक विशेष गट न्यायव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.  जिथे बिगर भाजप राज्य सरकारे आहेत त्या राज्यांचे अधिकार काढून घेण्यात आलेत किंवा राज्यपालांच्या माध्यमातून सरकार कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांना देण्यात येणार
 माझी आक्का आज जागतिक स्तरावर मातृदिन साजरा केला जातो. त्याग, समर्पण आणि निस्वार्थ प्रेमाचा हा अखंड झरा म्हणजे आई.  माझ्या आईला आम्ही सर्व आक्का म्हणतो, गावात सगळे तिला आक्काच म्हणतात. स्वभावाने जरा तापट, बोलण्यात फटकळ, अडाणी पण तितकीच प्रेमळ, कष्टाळू साक्षात तुकाराम महाराजांची जिजाबाईच जणू. आम्ही लहानापासून अक्काचं कष्ट बघत आलोत. आमच्या घरची परिस्थिती जेमतेमच असल्याने आमच्याकडे गॅस, टीव्ही, पंखा असलं नावालासुद्धा नव्हतं त्यामुळे सकाळी चुलीला पोचारा द्यायचा, आडावरून शेंदून पाणी आणायचं, चूल पेटवून चहा करायचा, मग स्वयंपाक, वडील गावपुढारी असल्याने घरी माणसं भेटायला येत मग पुन्हा चहा, रोज 30-40 कप चहा झाल्याशिवाय चुलीवरचं भगूलं कधी खाली उतरलं नाही. ऊन वर आल्यावर आक्का भाकरी बांधून पाटी डोक्यावर घेऊन रानात जायची. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतात काम करत राहायचं. संध्याकाळी दिवेलागणीला पुन्हा घरी यायचं, पुन्हा चूल पेटवायची,  पावसाळ्यात सरपण ओलं झाल्याने चूल पेटता पेटत नसायची मग कधी चुलीला तर कधी आम्हाला शिव्या देत देत कशीबशी आक्का चूल पेटवायची. आमची आक्का देवीची खूप मोठी भक्त आहे, गावच
                          दशकातला अखेरचा दिवस २०२० हे वर्ष मला १२ महिन्यांचे कधी वाटलेच नाही, फक्त हे दिवस लवकर संपावेत असंच वाटत होतं. या वर्षाने तसं पाहिलं तर प्रचंड त्रासही दिलाय आणि काही चांगलंही दिलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला जमिनीवर आणलंय. पैसा, प्रतिष्ठा, पद,  सत्ता, मालमत्ता  या सगळ्यापेक्षा आरोग्य, माणुसकी हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे हे माणसाला कळलं. सततच्या धावपळीत कधीही एकमेकांची साधी विचारपूसही न करणारी माणसं चक्क पहिल्यांदाच थांबली, आपल्या परिवारासोबत वेळ घालवला. सिमेंटविटांच्या बांधकामाला काही महिन्यांसाठी का होईना पण घरपण लाभलं. किंबहुना याची काळी बाजू म्हणजे यासोबतच घर चालवणाऱ्या अनेकांची रोजगार, उद्योगही बंद पडले आणि तेच 'घर आता खायला उठतंय' अशी अवस्था झाली.  मीच सर्वश्रेष्ठ आहे हे निसर्गानं या दशकाअखेर पुन्हा अधोरेखित केलंय. काही लोकांच्या मते हे जग २०१२ लाच बुडणार होतं म्हणे पण तेही इत्तर भाकिताप्रमाणे भाकडच होतं. पण २०२० या वर्षाने माणूसही या पृथ्वीतलावरून कायस्वरूपी नष्ट होऊ शकतो तोही अगदी डायनासोरसारखा अचानक! याची चाहूल जगाला नक्कीच दिलीय. 

जाऊ आनंदाच्या गावा - 10

भाऊ  आणि सता काकू  आमच्या नव्याने बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात दोन मुख्य परिवार राहायचे. एक म्हणजे आमचं वडील आणि चुलते असं सहा जणांचं कुटुंब आणि सोनारावाच्या चार मुलांची कुटुंब.आणि सोपानबापूच्या अर्जुन तात्याचं एक कुटुंब.अशी ११ कुटुंब या वाड्यात वास्तव्याला असायची. वाडाही अतिशय सुंदर बांधलेला पुढे भक्कम सागवानाचा मुख्य दरवाजा लागूनच आतमध्ये ढाळंज म्हणजे बैठकखोली नंतर रांगेत दोन्ही बाजूने ५-५ खोल्या आणि वाड्याबाहेर लागूनच पुन्हा एक प्रशस्त बैठक खोली, आणि मधल्या मोकळ्या दगडी चिऱ्याची फरशी असा फरसबंदी वास्तुपुरुष! आमचे मोठे चुलते नामदेव भाऊ अतिशय कष्टाळू पण जन्मतःच एका हाताला बोटंच नाहीत कदाचित देवाने बोटं कोरायची विसरून गेलेली त्यामुळे नुसताच हाताच्या मुठीला गोळा चपखल हनुमंताच्या गदेसारखा. स्वभावानं शांत आणि कमी बोलणारे भाऊ घरात थोरले, अपार कष्ट उपसत यांची जिंदगी आता मावळतीच्या सूर्यासारखी थकून गेलीय पण नशिबातले कष्ट मात्र सुटले नाहीत. वंशाला दिवा पाहिजे या आशेपोटी झालेल्या ७ पोरींचा बाप आणि म्हातारपणात झालेला लेक असं १० जणांचं कुटुंब एका हातावर जगवणारे आमचे थकलेले मळकट धोतरातील भ

जाऊ आनंदाच्या गावा - 9

Image
गावगाडा भारतात ग्रामीण संस्कृती जितकी समृद्ध होती तितकी कुठल्याच देशात बहुधा नसावी किंबहुना नव्हतीच इतरत्र. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात रानटी संस्कृती जोर धरत होती त्यावेळी हिंदुस्थानातील गावे वेदघोषाने जागी व्हायची आणि कीर्तनाने आत्मतृप्त होऊन निद्राधीन व्हायची. स्वयंपूर्ण खेडी, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि बाराबलुते अठरापगडजातींनी भरलेले गाव, कित्येक चांगल्या वाईट परंपरा इथे जन्माला आल्या नंतर काही लुप्त झाल्या आणि काही टिकल्याही. त्यातल्या त्यात पूर्वीचे निबिड अभयारण्य आणि सध्याच्या मराठवाड्यात तर सतत आक्रमणं,लढाया अगदी कृष्ण देवरायापासून किंवा शालिवहनाच्या शासनकाळापासून ते अलीकडील मराठे, निजाम आणि नंतर स्वतंत्र भारत या सर्व संक्रमणाच्या काळात मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो.  या सर्व कठीण, अतिकठीण किंवा सुकर काळात आमच्या गावानेही अनेक प्रसंग आपल्या पोटात सामावून घेतले पण आम्हाला मोजकेच माहित आहेत एवढंच. पूर्वीचे आनंदगाव म्हणजे बहुतेक २०० वर्षांपूर्वी नक्की काळ सांगता येणार नाही पण जुन्या जाणत्या माणसाकडून ऐकायला मिळाले त्याप्रमाणे लांबवर ढग्या ड

जाऊ आनंदाच्या गावा - 8

Image
हरीमाय  आमचे दादा म्हणजे वडिलांचे वडील बन्सी रावजी विघ्ने. अतिशय बेरकी माणूस. अंगात प्रचंड ताकद, धिप्पाड शरीरयष्टी आणि अहोरात्र शिंदीवनात नशेत सुस्त मस्त जीवन जगणारी एक दिलदार आसामी!  पाटलाचे साहेबराव आणि आमचे दादा हे जिवलग मित्र शिंदीवनात यांची मैत्री सुरू झालेली ती शेवटपर्यंत टिकली. यांचे आहारशास्त्रही सर्वसमावेशक, अगदी बैलापासून ते मोरापर्यंत सर्वच प्राणीपक्षी यांच्या पोटाची आणि जिभेची हौस पूर्ण करणासाठी चालायचे.  एकदा भावकीच्या भांडणाचा राग मनात धरून यांनी एकजणांचा बैल कापून, शिजवून फस्त गेला असा किस्साही दादांनीच आम्हाला सांगितला होता. रावजीबुवांचा एकुलता एक वंशाचा दिवा असल्यामुळे जडणघडण तशी अतिशय बेफिकीरीत झालेली. आणि त्याचा परिणाम म्हणून बन्सीराव आणि वाद हे समीकरण गावाला मान्यच करून घ्यावे लागले. त्यावेळी गावाच्या पाटलाला सुद्धा यांनी कधी जुमानले नाही पाटलांसोबतसुद्धा मारामारी करून त्यांच्याही दहशतीला आव्हान देणारे हे गावातले पहिलेच गावकरी नंतर पाटलांच्याच नात्यातील मुलगी यांनी दुसरी धर्मपत्नी म्हणून घरात आणली ती म्हणजे आमची आजी हरीबाई. याचाही किस्सा वेगळाच होता, यांच्या सत

जाऊ आनंदाच्या गावा - 7

Image
शाळेतला पहिला दिवस प्रत्येक गोष्टीच एक वय असतं आणि त्याचे अर्थही प्रसंगानुरूप लावले जातात. पोरगी वयात आली म्हणजे इथे वेगळाच शृंगारिक अर्थ वगैरे किंवा पोराचं वय निघून चाललंय इथंही भलताच काळजीचा अर्थ, आता वय झालं ! इथं निराशावाणा अर्थ, या वयात तुम्हाला हे शोभतं का?असा टोमानवजा अर्थही वयोमानावरून काढता येतो शेवटी काय तर मराठीचे बोल कौतुके।।आता आमचंही वय शाळेत घालण्याजोगं झालं होतं एवढ्यासाठीच वयाची इतकी ऐशीतैशी !! आणि मग याच वयाचा दाखला देऊन  एके दिवशी घरच्यांनी शाळेत नाव घालायचं असं ठरवलं. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग आपण शाळेत जाणार म्हणजे नवे कपडे, अनवाणी पायाला एक नवी कोरी पॅरागॉनची चप्पल आणि दप्तर, पाटी पेन्सिल असं सर्वच नवीन मिळणार. शिवाय रोज संध्याकाळी घरी जेवणानंतर कविता, बाराखडी म्हणून दाखवल्यावर सगळेच कौतुक करणार आणि आपण काहीतरी वेगळे आहोत याचा अनुभव अगदी बालवयातच, पुढे जाऊन  काही त्याला अहंकार म्हणून वाढवतात तर काहीजण आत्मविश्वास! पण व्यक्तिमत्वाची बीज अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतून पेरली जातात बरं लहानपणात! आमच्या सवंगड्याचीही नावं शाळेत घातली जाणार होती, किडक्या, शे