Posts

Showing posts from 2026

Sleep Paralysis or Hounted?

  आमच्या गावी मी एकदा घरासमोर बाज टाकून मोकळ्या आकाशाखाली झोपलो होतो. उन्हाळा असल्याने पत्र्याच्या घरात उकाडा फार असायचा , म्हणून सर्वजण बाहेर ओसरीवरच झोपायचे. एकदा रात्रीच्या नीरव शांततेत मी गाढ झोपेत होतो, रात्र फार झाली होती रात्रीचे दोन वाजले असावेत बहुतेक, आमच्या घरामागे दूरपर्यंत मोकळे रान आहे आणि त्याच्या पाठीमागे टेकडया आहेत. अचानक रानातून दूरवरून कोणीतरी चालत माझ्याकडे चालत येतंय असा मला भास व्हायला लागला. पाउलांचा आवाज आणि सोबत लयबद्ध घुंगरांचा आवाज वाढत चालला होता.  हळूहळू ती आकृती जवळ येतेय याची स्पष्ट जाणीव व्हायला लागली. जसजशी ती आकृती जवळ येत होती तसा कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज मोठा व्हायला लागला. काही वेळातच ती आकृती माझ्या उशाला येऊन उभी राहिली. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज फुटत नव्हता, हाताचे बोट सुद्धा हलवण्याचे त्राण माझ्यात उरले नव्हते. मी असहाय्य्य होतो. मला ती आकृती आता स्पष्ट दिसत होती. एक जख्ख म्हातारा , डोक्याला गुलाबी रंगाचा फेटा , चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या भयंकर कि जणू चेहरा जळून खाली ओघळतोय, त्याच्या हातात काठी होती आणि काठीला वरती घुंगर...