Sleep Paralysis or Hounted?
आमच्या गावी मी एकदा घरासमोर बाज टाकून मोकळ्या आकाशाखाली झोपलो होतो. उन्हाळा असल्याने पत्र्याच्या घरात उकाडा फार असायचा , म्हणून सर्वजण बाहेर ओसरीवरच झोपायचे.
एकदा रात्रीच्या नीरव शांततेत मी गाढ झोपेत होतो, रात्र फार झाली होती रात्रीचे दोन वाजले असावेत बहुतेक, आमच्या घरामागे दूरपर्यंत मोकळे रान आहे आणि त्याच्या पाठीमागे टेकडया आहेत. अचानक रानातून दूरवरून कोणीतरी चालत माझ्याकडे चालत येतंय असा मला भास व्हायला लागला. पाउलांचा आवाज आणि सोबत लयबद्ध घुंगरांचा आवाज वाढत चालला होता.
हळूहळू ती आकृती जवळ येतेय याची स्पष्ट जाणीव व्हायला लागली. जसजशी ती आकृती जवळ येत होती तसा कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज मोठा व्हायला लागला. काही वेळातच ती आकृती माझ्या उशाला येऊन उभी राहिली.
मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज फुटत नव्हता, हाताचे बोट सुद्धा हलवण्याचे त्राण माझ्यात उरले नव्हते. मी असहाय्य्य होतो. मला ती आकृती आता स्पष्ट दिसत होती. एक जख्ख म्हातारा , डोक्याला गुलाबी रंगाचा फेटा , चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या भयंकर कि जणू चेहरा जळून खाली ओघळतोय, त्याच्या हातात काठी होती आणि काठीला वरती घुंगरू बांधलेले होते.
तो काही क्षण तसाच माझ्या उशाला उभा राहिला आणि त्याने जमिनीवर काठी आपटली सोबत घुंगराचा आवाज कानात शिसे ओतल्यासारखे घुमला आणि मी सुन्न झालो. तो जसजसा काठी आपटत होता तसतसा मी हवेत वर तरंगत गेलो. एक क्षण मला असा वाटले आपला मृत्यू झालाय आणि आपला आत्मा शरीर सोडून वर चाललाय. मी रडण्याचा , ओरडण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच करता येत नव्हते.
हा प्रसंग माझ्यासोबत काही वेळ चालला आणि मी परत जमिनीवर आलोय असा भास मला झाला. तो म्हातारा क्षणात नाहीसा झाला. मी डोळे उघडले, हातपाय हलवून पहिले , माझ्या अंगात त्राण आले होते , मी उठलो आजूबाजूला पाहिलं तर कोणीही नव्हतं, फक्त कुत्र्यांचा विव्हळण्याचा आवाज येत होता....!
मी पाणी प्यायलो, हळूच घरामागे जाऊन पाहिलं तर कोणीही नव्हते , फोन मध्ये टाइम पाहिला तर रात्रीचे अडीच वाजले होते. मी परत येऊन बिछान्यावर पडलो. पण मला झोप येत नव्हती, घाम फुटला होता. घरचे घाबरतील म्हणून मी त्यांना उठवले नाही. झाला प्रकार लोक आपल्याला हसतील म्हणून मी कोणालाही सांगितला नाही.
पण काही महिन्यानंतर मी गावी गेलो आणि तोच प्रकार पुन्हा माझ्यासोबत घडला , तोच काळाकुट्ट म्हातारा त्याच वेळी माझ्या अशाही येऊन घुंगराची काठी आपटत उभा राहिला. ही घटना त्याच जागी त्याच वेळी पुन्हा घडल्यामुळे मी घरच्यांना शेअर केली. पण त्यांनी इथं असं काहीही नाहीये, समोरच हनुमंताचे मंदिर आहे इथं भूत यायची हिम्मत करणार असं सांगितले.
पण याचा शोध घायचा ठरवला , थोडा रिसर्च केला आणि माझ्या लक्षात आले की , हा प्रकार म्हणजे sleep paralysis आहे , आणि अनेकांसोबत घडतो. स्ट्रेस, अति थकवा , झोपायची जागा बदलणे अशा गोष्टींमुळे असा deep experiance येऊ शकतो.
मग त्यानंतर मी कधीही घराबाहेर झोपलो नाही , आता तर नवीन घर बांधल्यामुळे त्या जागेवर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जागा बदलल्या मुळे मला त्या प्रसंगामुळे असा अनुभव परत कधीही आला नाही.
तुम्हाला काय वाटत? हे sleep paralysis असेल कि paranormal activity?

Comments
Post a Comment