जाऊ आनंदाच्या गावा - 6
खोडकर आणि खेळकर बालपण आमच्यात सर्वात जास्त चपळ आणि कुटाणेखोर असायचा तो म्हणजे प्रभू अण्णाचा हण्या आम्ही त्याला बप्पा म्हणत असू. याच्या मेंदूत सतत काहींना काही तरी नवीन शक्कल यायच्या. एकदा हा त्याच्या आजोळी सोनगिरीला गेला आणि एक नवीनच खेळ घेऊन आला, घोड्यावरचा राजा आणि पहिला प्रयोग केला तो बिचाऱ्या किरीमावरच. किरिमा म्हणजेच बळीराम त्याला करिष्मा म्हणता येत नव्हतं म्हणून तो किरिमा असं म्हणायचं पुढं हीच त्याची चीड पडली. महाराज म्हणून एकमुखाने किरिमाची निवड झाली सगळी वानरसेना महाराजांचा जयघोष करू लागली... महाराजांना घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांचा घोडा म्हणून आडदांड टूम्या महाद्याला वाकवण्यात आलं आणि महाराज डोळे मिटून घोड्यावर बसले. आता खरी गम्मत इथून पुढे .... मला महाराजांच्या हातात तलवार द्यायचं काम सोपवलं होतं ती तलवार म्हणजे घाणीत बुडवलेली काठी! जिकडून बुडवली ती बाजू महाराजांच्या हातात द्यायची हे काम म्हणजे खरं तर मार खायची पंचाईत म्हणून हण्याने मुद्दाम हे काम स्वतःकडे घेतले नाही. मी पटकन महाराजांच्या हातात ती गुशोभित...