Is India becoming a DICTATORSHIP? वन नेशन वन पार्टी की हुकूमशाहीची सुरुवात? २० वर्षांपूर्वी जेव्हा स्व. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावरून पायउतार झाले तेव्हा फार वाईट वाटले होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे आम्हाला भाजपाची ओळख झाली आणि या पक्षाबद्दल एक विशेष आकर्षण राहिले. पण आता भाजपा पक्षात फार मोठा बदल झालाय, वरिष्ठ नेतृत्व "हे एक देश एक पक्ष पॉलिसी " या दिशेने देशाला हळूहळू पुढे नेत आहे. इतर राजकीय पक्षांना आमच्यात विलीन व्हा अन्यथा तुरुंगात जा हे दोनच पर्याय दिले आहेत . खालील काही मुद्दे विचार करण्या सारखे आहेत: आज सुप्रीम कोर्टाच्या नामवंत वकिलांनी सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे ज्यात ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह एकूण 600 वकिलांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. देशातील एक विशेष गट न्यायव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. जिथे बिगर भाजप राज्य सरकारे आहेत त्या राज्यांचे अधिकार काढून घेण्यात आलेत किंवा राज्यपालांच्या माध्यमातून सरकार कंट्रोल करण्याचा प्रयत्...
Posts
Showing posts from 2024