Posts

Showing posts from May, 2021
 माझी आक्का आज जागतिक स्तरावर मातृदिन साजरा केला जातो. त्याग, समर्पण आणि निस्वार्थ प्रेमाचा हा अखंड झरा म्हणजे आई.  माझ्या आईला आम्ही सर्व आक्का म्हणतो, गावात सगळे तिला आक्काच म्हणतात. स्वभावाने जरा तापट, बोलण्यात फटकळ, अडाणी पण तितकीच प्रेमळ, कष्टाळू साक्षात तुकाराम महाराजांची जिजाबाईच जणू. आम्ही लहानापासून अक्काचं कष्ट बघत आलोत. आमच्या घरची परिस्थिती जेमतेमच असल्याने आमच्याकडे गॅस, टीव्ही, पंखा असलं नावालासुद्धा नव्हतं त्यामुळे सकाळी चुलीला पोचारा द्यायचा, आडावरून शेंदून पाणी आणायचं, चूल पेटवून चहा करायचा, मग स्वयंपाक, वडील गावपुढारी असल्याने घरी माणसं भेटायला येत मग पुन्हा चहा, रोज 30-40 कप चहा झाल्याशिवाय चुलीवरचं भगूलं कधी खाली उतरलं नाही. ऊन वर आल्यावर आक्का भाकरी बांधून पाटी डोक्यावर घेऊन रानात जायची. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतात काम करत राहायचं. संध्याकाळी दिवेलागणीला पुन्हा घरी यायचं, पुन्हा चूल पेटवायची,  पावसाळ्यात सरपण ओलं झाल्याने चूल पेटता पेटत नसायची मग कधी चुलीला तर कधी आम्हाला शिव्या देत देत कशीबशी आक्का चूल पेटवायची. आमची आक्का देवीची खूप मोठी ...