Posts

Showing posts from December, 2020
                          दशकातला अखेरचा दिवस २०२० हे वर्ष मला १२ महिन्यांचे कधी वाटलेच नाही, फक्त हे दिवस लवकर संपावेत असंच वाटत होतं. या वर्षाने तसं पाहिलं तर प्रचंड त्रासही दिलाय आणि काही चांगलंही दिलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला जमिनीवर आणलंय. पैसा, प्रतिष्ठा, पद,  सत्ता, मालमत्ता  या सगळ्यापेक्षा आरोग्य, माणुसकी हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे हे माणसाला कळलं. सततच्या धावपळीत कधीही एकमेकांची साधी विचारपूसही न करणारी माणसं चक्क पहिल्यांदाच थांबली, आपल्या परिवारासोबत वेळ घालवला. सिमेंटविटांच्या बांधकामाला काही महिन्यांसाठी का होईना पण घरपण लाभलं. किंबहुना याची काळी बाजू म्हणजे यासोबतच घर चालवणाऱ्या अनेकांची रोजगार, उद्योगही बंद पडले आणि तेच 'घर आता खायला उठतंय' अशी अवस्था झाली.  मीच सर्वश्रेष्ठ आहे हे निसर्गानं या दशकाअखेर पुन्हा अधोरेखित केलंय. काही लोकांच्या मते हे जग २०१२ लाच बुडणार होतं म्हणे पण तेही इत्तर भाकिताप्रमाणे भाकडच होतं. प...