Posts

Showing posts from October, 2018

जाऊ आनंदाच्या गावा - 10

भाऊ  आणि सता काकू  आमच्या नव्याने बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात दोन मुख्य परिवार राहायचे. एक म्हणजे आमचं वडील आणि चुलते असं सहा जणांचं कुटुंब आणि सोनारावाच्या चार मुलांची कुटुंब.आणि सोपानबापूच्या अर्जुन तात्याचं एक कुटुंब.अशी ११ कुटुंब या वाड्यात वास्तव्याला असायची. वाडाही अतिशय सुंदर बांधलेला पुढे भक्कम सागवानाचा मुख्य दरवाजा लागूनच आतमध्ये ढाळंज म्हणजे बैठकखोली नंतर रांगेत दोन्ही बाजूने ५-५ खोल्या आणि वाड्याबाहेर लागूनच पुन्हा एक प्रशस्त बैठक खोली, आणि मधल्या मोकळ्या दगडी चिऱ्याची फरशी असा फरसबंदी वास्तुपुरुष! आमचे मोठे चुलते नामदेव भाऊ अतिशय कष्टाळू पण जन्मतःच एका हाताला बोटंच नाहीत कदाचित देवाने बोटं कोरायची विसरून गेलेली त्यामुळे नुसताच हाताच्या मुठीला गोळा चपखल हनुमंताच्या गदेसारखा. स्वभावानं शांत आणि कमी बोलणारे भाऊ घरात थोरले, अपार कष्ट उपसत यांची जिंदगी आता मावळतीच्या सूर्यासारखी थकून गेलीय पण नशिबातले कष्ट मात्र सुटले नाहीत. वंशाला दिवा पाहिजे या आशेपोटी झालेल्या ७ पोरींचा बाप आणि म्हातारपणात झालेला लेक असं १० जणांचं कुटुंब एका हातावर जगवणारे आमच...